चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी दिवसा झोपण्याच्या सवयीला वाईट का म्हटले आहे हे जाणुन घेऊया.
न दिवा स्वप्नं कुर्यात्
आयुः क्षयी दिवा निद्रा
आचार्य चाणक्य यांनी या दोन श्लोकांमध्ये सांगितले आहे की दिवसा झोपणे माणसाच्या आरोग्यासाठी कसे हानिकारक असू शकते.
चाणक्य पहिल्या श्लोकात सांगतात की दिवसा झोपल्याने कामात नुकसान होते. म्हणजे माणसाचा वेळ वाया जातो. दिवसा झोपणे हे फक्त आजारी व्यक्ती आणि मुलांसाठी योग्य मानले जाते.
दुसऱ्या श्लोकात चाणक्य म्हणतात की दिवसा झोपल्याने माणसाचे आयुष्य कमी होते. झोपेत असताना माणसाचा श्वास वेगवान होतो. दिवसा झोपल्याने आयुष्य कमी होऊ शकते.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या