चाणक्य नितीतील हे तीन श्लोक ठरतील जीवनात मार्गदर्शक
Lifestyle Jan 06 2025
Author: Jagdish Bobade Image Credits:adobe stock
Marathi
हे श्लोक महत्वाचे
आचार्य चाणक्य कुशल मुत्सद्दी व अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी आपल्या धोरणांद्वारे समाजाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या नीतीतील हे श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत.
Image credits: adobe stock
Marathi
श्लोक
यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति चाध्रुवं नष्टमेव हि ॥
Image credits: adobe stock
Marathi
अर्थ
जो माणूस निश्चित म्हणजे योग्य गोष्टींचा त्याग करतो व अनिश्चित म्हणजे चुकीचा मार्ग पत्करतो, त्याच्या खऱ्या गोष्टीही नष्ट होतात. त्यामुळे निर्णय घेताना योग्य, अयोग्य काय तोलून पहा.
Image credits: adobe stock
Marathi
श्लोक
नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ॥
Image credits: adobe stock
Marathi
अर्थ
माणसाने त्याच्या वागण्यात खूप भोळे किंवा साधे नसावे. जंगलात आधी सरळ झाडे तोडली जातात आणि वाकडी झाडे उभी राहतात हे लक्षात ठेवा.
Image credits: social media
Marathi
श्लोक
कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ ।
कश्चाहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः ॥
Image credits: social media
Marathi
अर्थ
योग्य वेळ, योग्य मित्र, योग्य जागा, पैसे कमवण्याचे योग्य साधन, पैसा खर्च करण्याचा योग्य मार्ग आणि आपल्या उर्जेच्या स्त्रोताकडे लक्ष द्या, हे भविष्यात उपयुक्त ठरतील.