पिवळ्या रंगातील टिश्यू किंवा चंदेरी साडीवर अशाप्रकारचा ऑफ व्हाइट रंगातील ब्लाऊज घालू शकता. या साडीवर टेंम्पल किंवा कुंदन वर्क ज्वेलरी शोभून दिसेल.
पिवळ्या रंगातील साडीवर हिरव्या रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. अशाप्रकारचा हँडवर्क केलेला ब्लाऊज पिवळ्या रंगातील साडीवर छान दिसेल.
पिवळ्या रंगातील साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घालायचे असल्यास लाल रंग एकदम परफेक्ट आहे. याशिवाय ज्वेलरीही लाल किंवा मोत्याची ट्राय करू शकता.
प्लेन पिवळ्या रंगातील साडीवर रॉयल ब्लू रंगाचे ब्लाऊज एकदम परफेक्ट मॅचिंग आहे. यावर गोल्डन किंवा मोत्याची ज्वेलरी ट्राय करा.
मस्टर्ड रंगातील साडीवर अशाप्रकारचा मल्टीकरल फुल हँड ब्लाऊज घालू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
कढाई वर्क करण्यात आलेला पिकॉक कलर ब्लाऊज पिवळ्या रंगातील साडीवर परफेक्ट मॅच आहे. लग्नसोहळ्यावेळी अशाप्रकारचा ब्लाऊज ट्राय करू शकता.
पिवळ्या रंगातील साडीवर सी ब्लू रंगातील कॉन्ट्रस्ट ब्लाऊज शोभून दिसेल. अशाप्रकारची साडी लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.
पिवळ्या रंगातील पैठणी साडीवर पोपटी रंगातील ब्लाऊजही छान दिसेल. या साडीवर मराठमोळा लूक करुन लग्नसोहळ्यात मिरवू शकता.
शेतकरी बांधवांनो, तयार व्हा! या दिवशी येत आहे PM किसानचा 19 वा हप्ता
स्क्रॅप्सपासून बनवा 7 हँडबॅग्ज, टाकाऊ फॅब्रिकपासून फॅन्सी डिझाईन्स!
Republic Day 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा
शरिरावरील या 7 भागात चुकूनही लावू नका परफ्यूम, होईल नुकसान