जर तुम्हालाही तुमचे फीचर्स अधिक आकर्षक बनवायचे असतील, तर अदिती राव हैदरीकडून प्रेरणा घेऊन या हेअरस्टाईल्स ट्राय करू शकता.
ज्यांना पारंपरिक लूक आवडतो, त्यांच्यासाठी गजरा लावलेला अंबाडा एक उत्तम पर्याय आहे. ही स्टाईल चेहऱ्याचे फीचर्स स्पष्टपणे दाखवते आणि धारदार नाक असलेल्या मुलींवर ती खूप छान दिसते.
अदितीचा सर्वात क्लासी लूक म्हणजे सेंटर पार्टेड स्लिक बन. मधोमध भांग आणि व्यवस्थित बांधलेला लो बन चेहऱ्याची शार्पनेस अधिक उठवून दाखवतो.