येत्या 14 जानेवारीला मकर संक्रातीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी तिळाचे लाडू खासकरुन तयार केले जातात. पण यंदाच्या संक्रांतीला तिळापासून पुढील काही रेसिपी नक्की तयार करू शकता.
यंदाच्या मकर संक्रातीला तीळ मावा बर्फीची रेसिपी तयार करू शकता. यासाठी गूळ, तीळ, मावा आणि शेंगदाण्याचा वापर करावा लागेल.
मकर संक्रातीवेळी काळ्या तिळाच्या वड्या तयार करू शकता. यासाठी काळे तीळ, गूळ, खोबर, शेंगदाणे आणि ड्राय फ्रुट्सचा वापर करा.
तिळाची चिक्कीही यंदाच्या मकर संक्रातींवेळी तयार करू शकता. तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य वापरुनच चिक्की तयार करता येईल.
लहान मुलांसाठी मकर संक्रातींवेळी तिळाच्या लाडूएवजी कुकीज तयार करा. यासाठी काळ्या आणि पांढऱ्या तिळाचा वापर करू शकता.
मकर संक्रांतीला नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी गूळ पोळी तयार करू शकता. यावेळी गव्हाचे पीठ, गूळ, तीळ आणि तूपाचा वापर करावा लागेल.