बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे मधुमेहाची लागण होणे सामान्य बाब झाली आहे. या आजारावर ठोस उपचार नाही. यामुळे मधुमेह कसा नियंत्रणात ठेवायचा हे पाहूया...
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची मदत घेतली जाते. पण काही नैसर्गिक गोष्टींच्या मदतीनेही मधुमेहावर कंट्रोल करता येते.
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी भिजवलेले ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी अक्रोड किंवा बदामाचे सेवन करू शकता.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यासाठी रात्री 2-3 आवळ्याचे तुकडे पाण्यात भिजवून सकाळी खा. असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहिल.
बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.