डाएटमध्ये हाय फॅट लो कार्ब असतात. यामुळे वजन कमी होण्यासह मेटाबॉलिक हेल्थ सुधारले जाते. पण किटो डाएट करताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे हे पाहूया.
किटो डाएटमध्ये कार्बचे कमी प्रमाणात सेवन करावे लागते. सर्वसामान्यपणे 20-50 ग्रॅमच कार्बचे सेवन करू शकता. बहुतांशजण यावेळी कार्बच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करू नका.
किटो डाएट फॉलो करताना पुरेश्या प्रमाणात फॅट्सचे सेवन न केल्याने आहार असंतुलित होतो. यामुळे शरिरात थकवा, उर्जेची कमतरता जाणवते.
किटो डाएटमध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी असल्याने काहीजण प्रोटीनचे अत्याधिक सेवन करतात. यामुळे फॅट्स बर्न करण्यास अडथळा येऊ शकतो. अशातच प्रोटीनचेही किटो डाएटवेळी मर्यादेत सेवन करावे.
किटो डाएट करताना शरिराला हाइड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करा.
किटो डाएट करताना काहीजण वेगाने आणि लगेच वजन कमी होईल अशी अपेक्षा करतात. पण या डाएटमुळे शरिरातील उर्जेचा स्तर बदलला गेल्याने वजन कमी होण्यास काही कालावधी लागू शकतो.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.