कॅस्टर ऑइलमध्ये एरंडाचे तेल आहे. याचा वापर आयुर्वेदातील औषधे आणि अन्नपदार्थात केला जातो. एरंडाच्या बियांपासून तेल काढले जाते. जाणून घेऊया कॅस्टर ऑइलचे काही भन्नाट फायदे…
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कॅस्टर ऑइल फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते.
पीरियड्सवेळी कॅस्टर ऑइल फायदेशीर ठरते. याशिवाय गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅस्टर ऑइलचा वापर करावा.
स्नायूंच्या दुखण्याच्या समस्येचा सामना करत असाल तर कॅस्टर ऑइलने मसाज करावे. यामुळे स्नायूंना येणारी सूज कमी होऊ शकते.
कॅस्टर ऑइल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे ऑइल त्वचेवर मॉइश्चराइजरप्रमाणे काम करते. या तेलात व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिडमुळे त्वचा मॉइश्चराइज होते.