घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी बहुतांशजण रुम फ्रेशनरचा वापर करतात. पण नैसर्गिक सुवासाच्या माध्यमातून घरातील दुर्गंध दूर करता येऊ शकतो. यासाठी कोणत्या फुलांची रोप लावावीत हे पाहूया.
सुवासिक अशी चमेलीची फुलं मार्च महिन्यात फुलतात. याचे रोप तुम्ही घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये लावू शकता.
मधुमालतीचे फुल अत्यंत सुंदर दिसतेच पण त्याचा सुवासही छान असतो. रुम फ्रेशनरएवजी घराच्या बाल्कनीत मधुमालतीच्या फुलांचे रोप लावू शकता.
लेव्हेंडरच्या फुलांमुळे मन शांत होते. तुम्ही तणावापासून दूर राहता. घरात रुम फ्रेशनरएवजी लेव्हेंडरच्या फुलांचे रोप लावू शकता.
मोगऱ्याचा सुवास घरात दीर्घकाळ राहतो. याशिवाय मोगऱ्याच्या रोपामुळे घरात सकारात्मक उर्जा असल्यासारखे वाटते.
पांढऱ्या रंगातील रजनीगंधाचे फुल घराच्या बाल्कनीत लावू शकता. या रोपाला दररोज पाणी आणि थोड उन्हात ठेवणे फार गरजेचे असते.