रतन टाटा यांच्या वडिलांचा जन्म अनाथालयात झाला होता. ते एका मध्यमवर्गीय घरात जन्मले होते. त्यांचे आजोबा हे अहमदाबाद येथील टाटा ग्रुपच्या मिल्समध्ये काम करत होते.
रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी हलाखीत दिवस काढले होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर मोठा संकट कोसळलं होत.
अनाथालयात रतन टाटा यांच्या वडिलांचं जीवन बदललं होत. त्यांच्या वडिलांना टाटा कुटुंबांनी दत्तक घेतलं आणि नंतर सगळं वातावरण बदलून गेलं.
नवल टाटा यांचे शिक्षण लंडन येथे अकाउंटिंग या विषयात झालं असून त्यांनी २६ व्या वर्षी टाटा सन्स ग्रुप जॉईन केला होता.
नवल टाटा हे मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर पुढं आले. नंतर त्यांनी टाटा सन्सचा कारभार पाहायला सुरुवात केली.
नवल टाटा यांनी ईश्वराचे आभार मानले. त्यांनी मला गरिबीचा सामना करावा लागला, त्यामुळेच भविष्यातील अनेक कठीण गोष्टी पार करायला जमलं असं म्हटलं आहे.
रतन टाटा यांच्या वडिलांनी २ लग्न केले होते. नवल टाटा यांच्या पहिल्या पत्नीने रतन यांना जन्म दिला होता.