प्राजक्ता माळीला वाटते 'या' गोष्टीची भीती, माहित झाल्यावर उडेल थरकाप
Entertainment Sep 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagrm
Marathi
प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री असून ती कायमच चर्चेत राहत असते. आता एका मुलाखतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोशल मीडिया वापराबाबत केला दावा
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आताच एका मीडिया हाऊसला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडिया वापराबाबतचा एक धक्कादायक दावा केला आहे.
Image credits: Social media
Marathi
सोशल मीडियाची वाटायला लागली भीती
यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हटली की, 'मला आयुष्यात कशाचीच भीती वाटत नव्हती, पण आता मला खरंच सोशल मीडियाची भीती वाटते.'
Image credits: Social Media
Marathi
१९-२० वर्षाच्या मुलांबद्दल काय दावा केला?
'मला सायबर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळालेली. त्याच पोलिसांनी दोन १९ - २० वर्षांची बिचारी मुलं ज्यांना माहीतच नाहीये ते आयुष्यात काय करतायत.' असं प्राजक्ताने म्हटलं आहे.
Image credits: Social media
Marathi
मुलाला काय विचारलं?
मला एका मुलाला त्यांनी फोन करून दिला आणि मी त्याला विचारलं की, तू असं का केलंस? त्या मुलाने सोशल मीडियावर माझं अकाउंट उघडलं होत आणि त्यावर माझे खराब फोटो होते.
Image credits: Instagram
Marathi
तो निघाला प्राजक्ताचा चाहता
यावर बोलताना प्राजक्ता पुढं म्हणाली की, नाही तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता. तो फॅन आहे माझा, पण त्याला तो काय करतोय हे माहित नव्हतं. तो म्हणाला माझ्या घरी सांगू नका.