Marathi

माधवनने २१ दिवसांमध्ये वजन केलं कमी, जीम, डाएट न करता काय होत सूत्र?

Marathi

बॉलिवूड अभिनेते आर माधवन यांनी २१ दिवसात वजन केलं कमी

बॉलिवूडमधील अभिनेते आर माधवन यांनी २१ दिवसांमध्ये वजन कमी केलं आहे. कोणत्याही जीममध्ये न जाता कोणताही डाएट न घेता त्यांनी काय केलं तेच आपण जाणून घेऊयात.

Image credits: actor r madhavan instagram
Marathi

जीममध्ये पोहचून घाम गाळायची गरज नाही

सोशल मीडियावर आर माधवन यांनी त्यांच्या फिटनेसचे सोशल मीडियावर शेड्युल शेअर केले आहे. त्यांनी यामध्ये नेमकं वजन कशामुळं कमी झालं याबद्दलची माहिती दिली आहे.

Image credits: actor r madhavan instagram
Marathi

काय सांगितलं सूत्र?

इंटरमिटंट फास्टिंग, प्रत्येक घास ४५ ते ६० वेळा चावून खाणे, रात्री ७ वाजेपर्यंत जेवण करणे, सकाळी लांब चक्कर मारणे आणि रात्री स्क्रीनशिवाय शांत झोप असं आर माधवनचे सूत्र आहे.

Image credits: actor r madhavan instagram
Marathi

खाण्याची काय आहे पद्धत?

आपण सर्वात याआधी खाण्याची पद्धत समजून घ्यायला हवी असं आर माधवन यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपलं अन्न पाणी समजून प्या आणि पाणी अन्न समजून प्यावा.

Image credits: actor r madhavan instagram
Marathi

ठराविक वेळेतच जेवण करायला हवं

आपण ठराविक वेळेतच जेवण करायला हवं यावर त्यांचा प्रामुख्यानं भर आहे. रोजच शेवटचं जेवण पावणे सात असून दुपारी ३ नंतर कधीच अन्न खाल्लं नाही. 

Image credits: actor r madhavan instagram
Marathi

आहारात कशाचा समावेश असतो?

त्यांच्या आहारात भाज्या, हिरव्या पालेभाज्या, नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचा समावेश होता. त्यांनी प्रक्रिया केलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये.

Image credits: actor r madhavan instagram

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

गोविंदाने ४ टॉपच्या अभिनेत्रींना केलं डेट, लग्नानंतर होतं अफेअर

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे शिक्षण किती? त्यांना कोणती डिग्री मिळालीये?

Thama या हॉरर चित्रपटातील आयुष्मान खुराना आणि रश्मिका यांनी किती मानधन घेतले?