नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. चला, सविस्तर माहिती घेऊया...
राम चरणचा 'गेम चेंजर' आणि सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहेत.
कंगना राणौतचा चित्रपट 'इमर्जन्सी' आणि अजय देवगणचा चित्रपट 'आझाद' 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन स्टार्समध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.
सनी देओलचा चित्रपट 'लाहोर 1947' आणि अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशलचा चित्रपट 'छावा' आणि अहान शेट्टीचा चित्रपट 'सनकी' हे दोन्ही चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहेत.
सनी देओलचा 'जाट' आणि वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' 18 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट 'जॉली एलएलबी 3' आणि प्रभासचा चित्रपट 'द राजा साब' एकाच दिवशी म्हणजेच 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हृतिक रोशनचा चित्रपट 'वॉर 2' आणि मिथुन चक्रवर्तीचा 'द दिल्ली फाइल्स' १५ ऑगस्ट २०२५ रोजी एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
वरुण धवनचा चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' आणि ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1' देखील त्याच तारखेला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.