सुरेश धस यांनी बीडमध्ये इव्हेन्ट मॅनेजमेंट चालत असून येथे प्राजक्ता माळी येऊन गेल्याच म्हटलं होत. यावरून प्राजक्ता चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने पुण्यातील ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून नाट्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. तिच्या अभिनयातील सशक्ततेला शैक्षणिक पार्श्वभूमीचा मोठा आधार आहे.
प्राजक्ताने अभिनयाच्या सुरुवातीला नाटकांमध्ये काम केलं. यानंतर, तिने दूरचित्रवाणी मालिकांमध्ये प्रवेश केला.
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत 'मेघना देसाई'च्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली. तिची साधी, संस्कारी आणि प्रभावी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
तिने 'हंसा एक संयोग', 'मुळशी पॅटर्न', 'यडोंडी' आणि 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या चित्रपटांत काम करून मोठ्या पडद्यावरही आपली ओळख निर्माण केली.
तीने मराठी टेलिव्हिजनवरील 'महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर' आणि विविध पुरस्कार सोहळ्यांचे संचालन करून आपली निवेदन कौशल्ये सिद्ध केली. प्राजक्ताला कविता लिहिण्याचा छंद आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपल्या दैनंदिन आयुष्याचे किस्से, प्रवास, काव्य आणि विचार शेअर करते.