आमिर खान महिन्याला घेणार इतके भाडे, अपार्टमेंटमध्ये तब्बल १२ फ्लॅट्स
Entertainment Aug 05 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान आला चर्चेत
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान हा परत एकदा चर्चेत आला आहे. त्याने भाड्याने दिलेल्या फ्लॅटमुळे तो माध्यमांमध्ये आला आहे.
Image credits: Social Media
Marathi
आमिर खानचे एकाच बिल्डिंगमध्ये १२ फ्लॅट्स
आमिर खानचे एकाच बिल्डिंगमध्ये १२ फ्लॅट्स आहेत. त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे काम चालू असल्यामुळे अभिनेता दुसऱ्या जागेवर राहायला गेला आहे.
Image credits: Social Media
Marathi
भाड्याने दिले ४ फ्लॅट्स
आमिर खान हा सध्या वांद्रे परिसरात राहत आहे. त्याने ४ फ्लॅट्स भाड्याने दिले असून त्याला भाड्याच्या रकमेच्या बदल्यात तब्बल २४.५ लाख रुपये मिळणार आहेत.
Image credits: Social Media
Marathi
फ्लॅट्सच्या भाडेकरूंसोबत ४५ महिन्यांचा केला करार
आमिर खान याने ४५ महिन्यांचा या फ्लॅट्ससाठी करार केला आहे. यावेळी तो दरवर्षी ५ टक्के भाडे वाढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Image credits: Social Media
Marathi
शाहरुख खान भाड्याने राहायला आला
शाहरुख खान हा पूजा कासा या इमारतीत राहायला आला आहे. या इमारतीमधील फ्लॅटचे त्याने २.९ कोटी रुपये भाडे दिले असून त्या इमारतीची मालकी भगनानी कुटुंबाच्या नावावर आहे.