जगातील दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि गायक ए आर रहमान त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहेत
रहमानचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी मद्रास (आताचे चेन्नई, तामिळनाडू) येथे एका हिंदू कुटुंबात झाला.
आपल्या बहिणीच्या आजारपणात ते एका सुफी संताच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि आपले नाव बदलून अल्लाह रखा रहमान ठेवले.
एआर रहमान यांना त्यांच्या पहिल्या चित्रपट 'रोजा'साठी राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
रहमान यांनी आतापर्यंत दोन ऑस्कर, दोन ग्रॅमी, एक बाफ्टा अवार्ड, एक गोल्डन ग्लोब अवार्डसहित ६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच अनेक फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
एआर रहमानने एअरटेलची सिग्नेचर ट्यूनही तयार केली आहे. एकेकाळी ही रिंगटोन संपूर्ण भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची पहिली पसंती होती.
भारती टेलने दिलेल्या माहितीनुसार, एआर रहमानने तयार केलेली एअरटेलची सिग्नेचर ट्यून १५० दशलक्षपेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाली आहे.
२००४ मध्ये आलेला कन्नड सिनेमा 'लव्ह'मध्येही हीच धून वापरण्यात आली होती. जे खूप लोकप्रिय झाले.