दिवाळखोरीत असताना देखील अमिताभ बच्चन यांनी १ रुपयात केला 'हा' चित्रपट
Entertainment Dec 04 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Social Media
Marathi
अमिताभ बच्चन दिवाळखोरीत निघाल्याचा काळ
1999 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक असा काळ आला जेव्हा त्यांची कंपनी ABCLला तोटा झाला आणि ते दिवाळखोर झाले. कर्जबाजारी झालेल्या अमिताभ बच्चन यांचे चित्रपटही चालत नव्हते.
Image credits: Social Media
Marathi
गरिबीच्या काळातही बिग बींना यश चोप्रांच्या उपकाराची झाली आठवण
जरी अमिताभ बच्चन गरिबीच्या काळातून जात होते. तरी देखील या काळातही त्यांना यश चोप्रांनी केलेल्या उपकाराची आठवण झाली आणि ते फक्त १ रुपयात त्यांच्यासाठी चित्रपट करण्यास तयार झाले.
Image credits: Social Media
Marathi
चित्रपट निर्माते निखिल अडवाणींनी बिग बी-यश चोप्रांचा किस्सा सांगितला
चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि यश चोप्रा यांच्यातील नात्याबद्दल सांगितले आणि त्यादरम्यान त्यांच्या दोन चित्रपटांचा उल्लेख केला.
Image credits: Social Media
Marathi
जेव्हा अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रांकडे खुलेपणाने मागितली फी
निखिल म्हणाले ,"सिलसिला बनवताना, यश चोप्रांनी बच्चन यांना विचारले, 'तुम्हाला किती मानधन हवे ?' ते म्हणाले, "मला घर घ्यायचे आहे, म्हणून यावेळी मला तुमच्याकडून चांगली रक्कम हवी आहे."
Image credits: Social Media
Marathi
…आणि जेव्हा अमिताभ बच्चन यांनी फक्त एक रुपया फी मागितली
निखिल म्हणाले की, 'मोहब्बतें' दरम्यान, यशजी यांनी फी विचारली तेव्हा बिग बी म्हणाले,' तेव्हा तुम्ही मला मी मागितले तेवढे पैसे दिलेत. यावेळी मी 1 रुपयात चित्रपट करणार आहे.'
Image credits: Social Media
Marathi
'मोहब्बतें' ब्लॉकबस्टर ठरला
'मोहब्बतें' 2000 साली रिलीज झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने भारतात 41.88 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात 76.91 कोटी रुपयांची कमाई केली.