अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाचे वादळ बॉक्स ऑफिसवर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चित्रपट रोज कमाईत नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.
अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' रिलीज होऊन २७ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने २७ व्या दिवशी ७.६५ कोटी रुपयांची कमाई केली. त्याचवेळी हिंदीत ६.२५ कोटींची कमाई केली.
'पुष्पा २' ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर ११७१.४५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यानुसार हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा २' च्या हिंदी आवृत्तीने आतापर्यंत ७६५.१५ कोटी रुपये कमाई केली आहे. यामुळे हा हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
तु 'पुष्पा २'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. Mythri Movie Makers ने पोस्ट शेअर करून सांगितले की, या चित्रपटाने १७६० कोटींची कमाई केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा २'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली २'ला मागे टाकले आहे आणि सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. 'बाहुबली २'चे कलेक्शन १७४२.३ कोटी रुपये आहे.
जगभरात १७६० कोटींची कमाई केल्यानंतर आता 'पुष्पा २' ने आमिर खानच्या दंगल या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याने २०१४ कोटींची कमाई केली आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांनी ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार केला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल देखील आहेत.