साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहु प्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २' ५ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहेत
'पुष्पा २'ने रिलीजपुर्वीच एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. हा चित्रपट अॅडव्हान्स बुकींगच्या माध्यमातून कोट्यवधि रुपयांची कमाई करत आहे. तसेच याला उत्तर अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने फक्त उत्तर अमेरिकेत प्रिव्ह्यू शोच्या अॅडव्हांस बुकिंगच्या माध्यमातून १४.७८ कोटी रुपये कमावले आहेत.
प्रभासचे चित्रपट 'कल्कि २८९८' आणि 'सलार' सारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड 'पुष्पा २' तोडणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल
अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. १५०-१९५ कोटी रुपयांत बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळी ३६० ते ३९३.५० कोटींची कमाई केली होती.
'पुष्पा २' जवळपास ४००-५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. अशात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करू शकतो.