भोपाळच्या ऐशबाग परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पोलीस एएसआयने पत्नी आणि मेहुणीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार झाला आहे.
एएसआय योगेश मारावी असे आरोपीचे नाव असून तो मंडला जिल्ह्यात तैनात आहे. पत्नी विनीता भोपाळमध्ये काम करत होती व ऐशबाग पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभात पेट्रोल पंपाजवळ बहिणीसोबत राहत होती.
ऐशबाग पोलिसांनी सांगितले की, योगेश सकाळी 11 वाजता घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी विनीता हिने मोलकरणीसाठी दरवाजा उघडला. मात्र योगेशने आत येऊन दरवाजा बंद करून दोघींवर हल्ला केला.
पत्नी विनीता आणि योगेश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. दोघेही वेगळे राहत होते. बायकोला मारायला तो आला होता, पण मेघा तिला वाचवायला आली तेव्हा त्याने तिचीही हत्या केली.
कोणाला काही समजण्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला. मोलकरणीने शेजाऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. आरोपी एएसआय फरार झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
एएसआयने पत्नी आणि मेहुणीची हत्या का केली याचा तपास अद्याप लागलेला नाही. योगेशचा पत्नीशी कोणत्या मुद्द्यावरून वाद होता? याचा तपास पोलीस करत आहेत.