
YouTube Outage : गूगलचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब, आज पहाटे जागतिक स्तरावर बंद पडल्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे ५ वाजता आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत यूट्यूब स्ट्रीमिंगमध्ये व्यत्यय आल्याचे वृत्त आहे. यूट्यूब म्युझिकसह इतर यूट्यूब प्लॅटफॉर्मवरही ही समस्या दिसून आली. जगभरातील लाखो वापरकर्त्यांना यूट्यूब आउटेजचा फटका बसला. सकाळी ५.२३ पर्यंत, डाउनडिटेक्टरवर यूट्यूब उपलब्ध नसल्याच्या सुमारे साडेतीन लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या. यूट्यूबच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा आउटेज होता.
भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांमध्ये यूट्यूब स्ट्रीमिंगमध्ये व्यत्यय आला. डाउनडिटेक्टरवर नोंदवलेल्या ५६ टक्के तक्रारींमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये समस्या येत असल्याचे म्हटले होते. ३२ टक्के लोकांनी यूट्यूब मोबाईलवर उपलब्ध नसल्याची तक्रार केली. १२ टक्के लोकांनी वेबसाइट ॲक्सेस करता येत नसल्याचे सांगितले. व्हिडिओ लोड होत नाहीत, सर्च केल्यावर रिझल्ट्स मिळत नाहीत, कमेंट्स दिसत नाहीत अशा अनेक तक्रारी यूट्यूब दर्शकांनी केल्या. यूट्यूब होम पेज उघडल्यावर एरर मेसेज दिसत असल्याची तक्रारही वापरकर्त्यांनी केली. #YouTubeDown हा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड करत होता आणि अनेक लोकांनी तिथे आपली नाराजी व्यक्त केली. अनेक एक्स वापरकर्त्यांनी यूट्यूब अचानक बंद झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले. व्हिडिओ अपलोड किंवा शेड्यूल करता येत नसल्याची क्रिएटर्सची मोठी तक्रार होती.
यूट्यूबच्या सर्व प्लॅटफॉर्मवरील समस्या दूर करण्यात आली असून वापरकर्त्यांच्या सहकार्याबद्दल यूट्यूब अधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत. यूट्यूब, यूट्यूब म्युझik आणि यूट्यूब चॅनलवर आता व्हिडिओ पाहता येतील, असे यूट्यूब अधिकाऱ्यांनी एक्सवर लिहिले आहे. तथापि, यूट्यूब सेवा जागतिक स्तरावर विस्कळीत होण्याचे कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. यूट्यूबकडून अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. गूगलच्या इतर सेवांवर या आउटेजचा परिणाम झाला आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही.
DownDetector नुसार, वापरकर्त्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्यापैकी 54% समस्या व्हिडिओ आणि संगीत स्ट्रीमिंगशी संबंधित होत्या.आत्तापर्यंत, YouTube ने या समस्येवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, YouTube सपोर्ट (मदत) 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर निराश वापरकर्त्यांच्या प्रश्नांना सक्रियपणे उत्तरे देत आहे, परंतु आत्तापर्यंत त्यांनी व्यत्ययाच्या संभाव्य कारणाबद्दल काहीही सांगितलेले नाही.
यूएस मधील YouTube आऊटेज मॅप (Outage Map)YouTube सेवांमधील बहुतेक व्यत्यय युनायटेड स्टेट्समध्ये नोंदवले गेले. DownDetector नुसार, या सेवांचा परिणाम सर्व प्रमुख शहरांमध्ये झाला. सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये सिएटल, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, फिनिक्स, शिकागो, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि डेट्रॉईट यांचा समावेश आहे. हा DDOS हल्ला (DDOS attack) असू शकतो, अशा दाव्यांनंतरही, YouTube ने हल्ल्याच्या कारणाबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही.