Mojtaba Khamenei : इराणचे पुढचे सर्वोच्च नेते? कोण आहेत 'निवडलेले' मुज्तबा खामेनी?

Published : Mar 01, 2026, 11:38 AM IST
Who Is Mojtaba Khamenei

सार

Who Is Mojtaba Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर देशाची सूत्रं कोण सांभाळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. यात त्यांचे दुसरे पुत्र मुज्तबा खामेनी यांचं नाव आघाडीवर आहे.

Who Is Mojtaba Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर, आता देशाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातू हवाई हल्ल्यात मारले गेल्याचंही म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुत्र मुज्तबा खामेनी यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. 'मुज्तबा' हा शब्द अरबी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ 'निवडलेला' असा होतो. इस्लामिक साहित्यात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासाठीही हे विशेषण वापरलं जातं.

कोण आहेत मुज्तबा खामेनी?

गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या १२ दिवसांच्या इराण-इस्रायल संघर्षानंतर मुज्तबा खामेनी हे नाव सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चेत आलं होतं. खामेनी यांच्या सहा मुलांपैकी मुज्तबा हे दुसरे पुत्र आहेत. होदा, बोशरा, मोस्तफा, मसूद आणि मेसम ही त्यांच्या इतर मुलांची नावं आहेत. १९६९ मध्ये इराणच्या मशहद शहरात जन्मलेले मुज्तबा एक धर्मगुरू आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान आणि इस्लामिक कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.

१९८७ मध्ये आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मध्ये सामील झाले. इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी देशासाठी सेवा बजावली. इराणमधील वरिष्ठ धर्मगुरू आणि IRGC च्या शक्तिशाली नेतृत्वासोबत मुज्तबा खामेनी यांचे खूप चांगले संबंध मानले जातात.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Europe Supermarket Hacking : युरोपमधील सुपरमार्केटचे फ्रीज कोण हॅक करतंय?
Indian Navy Rescue : भारतीय नौदलाची कमाल! २० नागरिकांची केली सुटका, इराणने मानले आभार