Khamenei Death : खामेनेईंच्या मृतदेहाचं काय झालं? ढिगाऱ्याखाली सापडले, नेतन्याहू आणि ट्रम्प यांनी पाहिले फोटो!

Published : Mar 01, 2026, 11:15 AM IST
Khamenei Body Found in Rubble After Airstrike Photos Shown

सार

Khamenei Body Found in Rubble After Airstrike Photos Shown : इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर तेहरानमधील खामेनेईंच्या घराच्या ढिगाऱ्याखालून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले.

Khamenei Body Found in Rubble After Airstrike Photos Shown : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्या मृतदेहाचं पुढे काय झालं, याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. 'जेरुसलेम पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखालून खामेनेई यांचा मृतदेह सापडला. शनिवारी संध्याकाळी इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. रिपोर्टनुसार, खामेनेईंच्या मृतदेहाचे फोटो पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दाखवण्यात आले. हे फोटो पाहून खात्री केल्यानंतरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ' सोशलवर (Truth Social) त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला. हवाई हल्ल्यांनंतर तेहरान शहरातील त्यांच्या घराच्या ढिगाऱ्यातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

AFP ने इस्रायलच्या दोन मोठ्या टीव्ही नेटवर्क्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, खामेनेईंच्या मृतदेहाचे फोटो हाती लागले आहेत. हल्ल्याचा ठोस पुरावा म्हणून हे फोटो थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे सोपवण्यात आले.

इस्रायलची मीडिया 'चॅनल 12' च्या रिपोर्टनुसार, खामेनेई हल्ल्याच्या वेळी जमिनीखाली बनवलेल्या एका गुप्त ठिकाणी होते. पण गुप्तचर यंत्रणांनी ही जागा शोधून काढली. हल्ल्याच्या वेळी खामेनेई आपलं काम करत होते. हल्ला सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांचे सहकारी अली शमखानी आणि सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी यांच्यासोबत बैठक घेतली होती. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात शमखानी यांचाही मृत्यू झाला.

अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार, इराणचे वरिष्ठ राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या तीन बैठका एकाच वेळी सुरू असल्याची माहिती अमेरिका आणि इस्रायलला मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी दिवसाढवळ्या हल्ला करण्याचा निर्णय घेतला. हल्ल्याच्या पहिल्या काही मिनिटांतच खामेनेईंच्या निवासस्थानावर ३० बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यात आतापर्यंत इराणचे ४० वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत.

या हल्ल्यात खामेनेईंचं संपूर्ण निवासस्थान उद्ध्वस्त झालं. यामध्ये खामेनेईंची मुलगी, नातवंड, जावई आणि सून यांचाही मृत्यू झाला. ट्रम्प यांनी सांगितलं की, हल्ला जरी इस्रायलने केला असला तरी, तो घडवून आणण्यात अमेरिकेची मोठी भूमिका होती. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमपासून खामेनेई वाचू शकले नाहीत, असंही ट्रम्प म्हणाले. हल्ल्यानंतर, तेहरानमधील खामेनेईंच्या निवासस्थानाचे सॅटेलाइट फोटोही समोर आले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ayatollah Khamenei : एका सामान्य धर्मगुरूचा मुलगा कसा बनला इराणचा सुप्रीम लीडर? वाचा सबकूछ
Khamenei Death : अयातुल्ला खामेनेई 'शहीद' घोषित, US-इस्रायल हल्ल्यानंतर इराण बदला घेणार?