फेसबुकमध्ये येणार नवीन अपडेट, टिकटॉकसारखं हे फिचर वापरता येणार

vivek panmand   | SIGWIRE
Published : Jul 26, 2026, 09:00 PM IST
Facebook layoff

सार

मेटा फेसबुकसाठी एक नवीन अपडेट आणत आहे, ज्यामुळे ॲप उघडताच युझर्सना टिक टॉकप्रमाणे फुल-स्क्रीन व्हिडीओ दिसतील. शॉर्ट व्हिडिओंच्या वाढत्या ट्रेंडमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे, पण युझर्सना जुन्या व्हर्जनवर परत जाण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

मेटाकडून फेसबुकवर नवीन अपडेट दिले जात आहेत. त्यामध्ये आता एक नवीन अपडेट आलं आहे. त्यामुळं युझर्स या फीचरबद्दल उत्सुक आहेत. आपण आता फेसबुक उघडलं तर फुल स्क्रीनवर व्हिडीओ दिसणार आहे. हे फिचर सर्वात आधी टिक टॉकमध्ये देण्यात आलं होतं. आता यामुळं खऱ्या अर्थानं टिक टॉकला स्पर्धा तयार झाली आहे.

फेसबुक उघडल्यावर लगेच दिसणार व्हिडीओ 

आपण आता फेसबुक उघडल्यानंतर आपल्याला व्हिडीओ दिसणार आहे. हे फिचर आणून कंपनीनं दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा सुरु केलीय. पण हे फिचर जबरदस्ती आपल्या मोबाईलमध्ये अपडेट करण्यात येणार नाही. फेसबुकचा वापर युजर्सने कमी केल्यामुळं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

शॉर्ट व्हिडिओचा आला ट्रेंड 

सध्याच्या काळात शॉर्ट व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. त्यामुळं युजर्सला हे अपडेट द्यायला हवं असं कंपनीला वाटत होतं. त्यानुसार कंपनीकडून हे अपडेट फेसबुकमध्ये दिलं जाणार आहे. आपण हे नवीन व्हर्जन अपडेट केलं आणि ते आवडलं नाही तर पहिलं व्हर्जन परत वापरता येणार आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय