Russian Oil: भारताला दिलासा; रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून ३० दिवस सूट

Published : Mar 06, 2026, 07:59 AM IST
US Grants India 30 Day Waiver to Purchase Russian Oil Amid Middle East Tensions

सार

US Grants India 30 Day Waiver to Purchase Russian Oil Amid Middle East Tensions: अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमधून एक महिन्यासाठी सूट दिली आहे.

वॉशिंग्टन: भारतासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमधून भारताला एका महिन्यासाठी सूट दिली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांनी ही घोषणा केली. यानुसार, समुद्रात असलेल्या रशियन टँकर्समधून तेल खरेदी करण्याची परवानगी भारताला मिळाली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे.

युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये रशियाच्या लुकोईल (Lukoil) आणि रॉसनेफ्ट (Rosneft) या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले होते. यामुळे, जानेवारी महिन्यात भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात घटून दररोज सुमारे ११ लाख (1.1 दशलक्ष) बॅरलवर आली होती. नोव्हेंबर २०२२ नंतरचा हा सर्वात कमी आकडा होता. अमेरिकेने शुल्क लावल्यानंतर रशियाकडून होणारी तेल आयात २१.२% नी कमी झाली होती.

मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यामुळे तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी २०% पुरवठा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणने नाकेबंदी केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या. आज सकाळी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८३.०७ डॉलरवर पोहोचली. मात्र, असं असलं तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नसल्याचं कळतंय.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!