Ukraine Drone Attack : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याने रशिया हादरला, मॉस्कोमधील विमानतळे बंद

Published : Jan 05, 2026, 09:10 AM IST
Ukraine Drone Attack Shuts Down Moscow Airports

सार

रशियन राजधानी मॉस्कोवर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्यानंतर, व्नुकोवो विमानतळासह तीन प्रमुख विमानतळे तात्पुरती बंद करण्यात आली. रशियन हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले परतवून लावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Ukraine Drone Attack : रशियाची राजधानी मॉस्कोवर युक्रेनने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर मॉस्कोमधील विमानतळे बंद करण्यात आली. यामध्ये मॉस्कोतील चारपैकी तीन विमानतळे बंद केल्याचे वृत्त आहे. 

युक्रेनच्या हल्ल्यामुळे विमानांना उशीर -

मॉस्कोचे दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या व्नुकोवो येथे युक्रेनच्या हल्ल्यामुळे विमानांना उशीर झाला. विमाने आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सेवा थांबवण्यात आल्याचे रशियन हवाई वाहतूक नियामक, रोसाव्हिएत्सियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

रशियाला हादरा -

आज स्थानिक वेळेनुसार दुपारी एक ते चारच्या दरम्यान सेवा स्थगित करण्यात आली होती. व्नुकोवो, डोमोडेडोवो आणि झुकोव्स्की या विमानतळांनी एका तासात अंशतः कामकाज सुरू केले आहे. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या संघर्षात युक्रेनने ही लष्करी कारवाई करून रशियाला हादरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने काल रशियावर तब्बल २७ ड्रोन डागले. रशियन हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले प्रभावीपणे परतवून लावल्याचे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे. यानंतर अमेरिकेने युक्रेनच्या विमानांवर आपल्या हवाई हद्दीत बंदी घातली. युक्रेनच्या सीमेवरील रशियन गाव बेल्गोरोडमध्ये ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नेपाळमध्ये वादग्रस्त व्हिडिओ पोस्टनंतर उसळली दंगल, मशिदीची तोडफोड, हिंसाचार सुरुच!
'मी निर्दोष, कोणताही गुन्हा केलेला नाही, मी व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष', मॅनहॅटन कोर्टात मादुरो यांचा दावा