
Trump Calls US India Trade Deal Historic and Boosts Coal Exports : भारतासोबत झालेल्या अंतरिम व्यापार कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ऐतिहासिक' म्हटले आहे. तसेच, 'आम्ही भारतात होणारी कोळशाची निर्यात वाढवणार आहोत,' अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
'चॅम्पियन ऑफ कोल' कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, 'माझ्या नेतृत्वाखाली अमेरिका सर्वात मोठा ऊर्जा निर्यातदार देश बनत आहे. कोळशाची निर्यात लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी आम्ही भारत, जपान, कोरियासह काही देशांसोबत ऐतिहासिक करार केले आहेत. यामुळे आम्ही जगातील सर्वोत्तम कोळसा जगभरात निर्यात करत आहोत,' असे ते म्हणाले.
भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत गेल्या शनिवारी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये भारत अमेरिकेकडून कोळशासह ४५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू ५ वर्षांत आयात करेल, अशी घोषणा करण्यात आली होती.
नवी दिल्ली: 'भारत-अमेरिका व्यापार करार आणि केंद्र सरकारची धोरणे कामगार, शेतकरी आणि देशविरोधी आहेत,' असा आरोप करत कामगार/शेतकरी संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या भारत बंदला थंड प्रतिसाद मिळाला. जनजीवनावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही आणि ते नेहमीप्रमाणे सुरळीत होते.
नवीन ४ कामगार संहिता रद्द करणे, बियाणे मसुदा विधेयक, वीज दुरुस्ती विधेयक आणि अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करणारे शांतता विधेयक मागे घेणे, मनरेगाची पुन्हा अंमलबजावणी, भारत-अमेरिका करार रद्द करणे यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. याला काँग्रेससह डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता.
या बंदमुळे ओडिशातील काही भागांमध्ये वाहतूक, बाजारपेठा आणि शैक्षणिक संस्थांच्या कामकाजावर थोडा परिणाम झाला. झारखंडमध्ये बँकिंग क्षेत्रावर बंदचा परिणाम दिसून आला. तामिळनाडूतील काही बंदरे आणि औद्योगिक क्षेत्रांतील कामात अडथळा निर्माण झाला. केरळ आणि पंजाब सरकारांनीही बंदला पाठिंबा दिल्याने काही अत्यावश्यक सेवा उपलब्ध नव्हत्या.