Tesla Full Self Driving Crash : 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' मोडवरील टेस्ला कारची पोलिसांच्या गाडीला धडक, २ अधिकारी जखमी

Published : Oct 20, 2026, 03:25 PM IST
Tesla Full Self Driving Crash : 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' मोडवरील टेस्ला कारची पोलिसांच्या गाडीला धडक, २ अधिकारी जखमी

सार

कॅलिफोर्नियामध्ये 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' मोडवर असलेल्या एका टेस्ला कारने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी आपण झोपलो होतो, अशी कबुली २२ वर्षीय ड्रायव्हरने पोलिसांना दिली.

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये एका टेस्ला कारने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात हायवे पेट्रोलिंगचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. ही कार 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' (FSD) मोडवर होती. ती बंद असलेल्या हायवेच्या लेनमध्ये घुसली आणि तिने पोलिसांच्या गाडीला उडवलं. अपघाताच्या वेळी आपण चक्क झोपलो होतो, असं २२ वर्षीय ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं. हा अपघात १३ ऑक्टोबर रोजी सॅन फ्रान्सिस्को बे एरियातील इंटरस्टेट ८० हायवेवर घडला.

ड्रायव्हरला लागली झोप

कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) ची गाडी एका दुसऱ्या अपघाताचा तपास करण्यासाठी तिथे उभी होती. त्याच गाडीवर ही टेस्ला कार जाऊन आदळली. अपघाताच्या ठिकाणी हायवेच्या अनेक लेन बंद करण्यात आल्या होत्या. तिथे वॉर्निंग फ्लेअर्स, ट्रॅफिक कोन्स आणि लुकलुकणारे इमर्जन्सी लाईट्सही लावले होते. पण या सगळ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत टेस्ला कार बंद लेनमध्ये घुसली आणि तिने पोलिसांच्या गाडीला मागून धडक दिली. या गाडीत बसलेले दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती CHP ने दिली. या घटनेचा डॅशकॅम व्हिडीओ CHP ने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

सेल्फ ड्रायव्हिंग पूर्णपणे सेफ नाही, जबाबदारी ड्रायव्हरचीच!

टेस्लाची 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' सिस्टीम हे काही पूर्णपणे स्वतः चालणारं तंत्रज्ञान नाही, असा स्पष्ट इशारा CHP ने दिला आहे. या सिस्टीमच्या नावावरून कुणीही गैरसमज करून घेऊ नये. गाडी सुरक्षित चालवण्याची जबाबदारी शेवटी ड्रायव्हरचीच असते, याची आठवण अधिकाऱ्यांनी करून दिली. या अपघातातून सुखरूप बचावलेल्या सॅक्रामेंटो येथील २२ वर्षीय ड्रायव्हरवर गुन्हे दाखल होणार की नाही, हे अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. दुसरीकडे, टेस्लाच्या अधिकृत वेबसाईटवरही हे स्पष्ट लिहिलंय की 'फुल सेल्फ ड्रायव्हिंग' सिस्टीम वापरताना ड्रायव्हरचं गाडीवर पूर्ण लक्ष असणं गरजेचं आहे. सध्या उपलब्ध असलेल्या फीचर्समुळे गाडी पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणावर चालत नाही, असं कंपनीनेही स्पष्ट केलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

France Looting Viral Video : फ्रान्समध्ये लुटालुटीदरम्यान कचऱ्याच्या डब्याजवळ सापडलं 'रोलेक्स' घड्याळ
Kim Jong Un Dead : किम जोंग उनचा मृत्यू? प्योंगयांगमध्ये ९००० चिनी सैनिक, अफवांना उधाण