Plane Crash : एअर इंडियाच्या विमानाप्रमाणेच प्रवासी विमान कोसळले, ४३ प्रवाशांचा मृत्यू, अँटोनोव्ह-२४ जंगलात कोसळले

Published : Jul 24, 2025, 02:10 PM ISTUpdated : Jul 24, 2025, 02:11 PM IST
plane crash

सार

रशियन राज्य वृत्तवाहिनी RT यांनी शेअर केलेल्या एका ८ सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये, झाडांनी भरलेल्या जंगलात विमानाचे अवशेष धुराच्या जाळात लपेटलेले दिसून येतात.

मॉस्को - रशियामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ४३ हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी घेऊन जात असलेले एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. या भीषण अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे.

अपघाताची घटना कशी घडली?

ही दुर्घटना सायबेरियामधील अँगारा (Angara) एअरलाइन्सच्या अँटोनोव्ह-२४ या विमानासोबत घडली. हे विमान ब्लागोव्हेचेंस्क (Blagoveshchensk) येथून उड्डाण करून तिंडा (Tynda) शहराकडे निघाले होते, जे अंबर (Amur) प्रांतामध्ये, चीनच्या सीमेवर वसलेले आहे.उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान रेडारवरून गायब झाले आणि त्यानंतर काही काळातच विमानाच्या अवशेषांचे दृश्य समोर आले.

विमानाच्या अवशेषांचे भीषण दृश्य

रशियन राज्य वृत्तवाहिनी RT यांनी शेअर केलेल्या एका ८ सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये, झाडांनी भरलेल्या जंगलात विमानाचे अवशेष धुराच्या जाळात लपेटलेले दिसून येतात. विमानाचा मुख्य भाग अर्थात फ्युसेलाज पूर्णपणे पेटलेला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या व्हिडीओमुळे दुर्घटनेचे भयावह स्वरूप जगासमोर आले आहे. अंबर प्रदेशातील घनदाट जंगलांमध्ये ही दुर्घटना घडल्याने बचावकार्यही अडचणींच्या काळातून पार पडले.

सर्व प्रवाशांचा मृत्यू

अंबर प्रांताचे राज्यपाल वासिली ऑर्लोव्ह (Vasily Orlov) यांनी टेलिग्राम वरून दिलेल्या माहितीप्रमाणे, या विमानात एकूण ४३ प्रवासी, यामध्ये ५ लहान मुले आणि ६ क्रू मेंबर्स होते. या अपघातात सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

अपघाताचे संभाव्य कारण अजून अस्पष्ट

या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल, मानवी चूक की अन्य कोणतीही कारणे याचा सखोल तपास सुरू आहे. रशियन नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (Russian Civil Aviation Authority) आणि आपत्कालीन यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

अँटोनोव्ह-२४ विमानांविषयी थोडक्यात

अँटोनोव्ह-२४ (Antonov-24) हे सोव्हिएत युगातील ड्युअल टर्बोप्रॉप इंजिन असलेले लहान प्रवासी विमान आहे. मुख्यतः कमी अंतराच्या विमानसेवेसाठी वापरले जाते. काही जुनी मॉडेल्स अजूनही रशिया आणि मध्य आशियामधील काही भागात कार्यरत आहेत, ज्यावर वारंवार सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)
पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांना मिळाली 'असीम' शक्ती, बनले पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस!