
Thailand: पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधात गुंतवून एका मोठ्या रॅकेटचा थायलंडमध्ये पोलिसांनी छापा घालून ताब्यात घेतलं आहे. विलवान एम्सवात नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेने बौद्ध भिक्षुंसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि फोटो, व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केलं आहे.
पोलिसांनी महिलेलं अटक केली असून बँकॉक येथील राहत्या घरातून अटक केली आहे. त्या महिलेच्या मोबाईलमधून अनेक बौद्ध भिक्षुंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. ब्लॅकमेलिंगबद्दलची माहिती मिळाली असून पोलिसांनी ८० हजार पेक्षा जास्त फाईल्स या डेटामधून मिळाल्या आहेत. या फाईलचा वापर करून ती बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करत असायची.
जूनमधील बॅंकॉंकमधील एका मठाचे मठाधीश गायब झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर महिलेने ते मठाधिपती हे महिलेचे पती असल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची नाव समोर आल्यानंतर हे प्रकरण ढवळून निघालं आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या महिलेने ३ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर भिक्षूंना ब्लॅकमेल केलं आणि १०२ कोटी कोटी रुपये केलं आहे. रॉयल थाई पोलिसांच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने माहिती दिली असून या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या ९ मठाधिपतींना काढले आहे. महिलेवर खंडणी, मनी लॉन्डरिंग आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन मठाधिपतींना पोलीस कोठडीत टाकण्यात आलं असून सर्व बौद्ध भिक्षुंवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे