Pakistan Blast: पाकिस्तानच्या डेरा इस्माईल खानमध्ये भीषण स्फोट, ११ जणांचा मृत्यू

vivek panmand   | CMS
Published : Sep 26, 2026, 07:34 PM IST
Pakistan Blast: पाकिस्तानच्या डेरा इस्माईल खानमध्ये भीषण स्फोट, ११ जणांचा मृत्यू

सार

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) पाकिस्तान सरकार दहशतवादावर भाषण ठोकत असतानाच, तिकडे पाकिस्तानात पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात अनेक जणांचा बळी गेलाय. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले होणं ही काही नवी गोष्ट नाही, आता पुन्हा एकदा तोच थरार पाहायला मिळालाय.

Dera Ismail Khan Blast: पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा स्फोटाने हादरलंय. खैबर-पख्तूनख्वा (Khyber-Pakhtunkhwa) प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील दाराजिंदा भागात शनिवारी हा स्फोट झाला. अमान मेला चेकपोस्टजवळ झालेल्या या स्फोटात किमान ११ जणांचा मृत्यू झालाय. तर ३० जण जखमी झाल्याची माहिती खैबर-पख्तूनख्वा रेस्क्यू ११२२ ने दिलीय. रेस्क्यू ११२२ चे प्रवक्ते बिलाल अहमद फैजी यांनी सांगितलं की, स्फोटाची माहिती मिळताच दाराजिंदा स्टेशनच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं. जखमी झालेल्या ३० जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय. घटनास्थळावरून ११ जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आलेत.

स्फोटानंतर बचावकार्य वेगात

स्फोटानंतर बचावकार्यासाठी सहा रुग्णवाहिका, एक अग्निशमन दलाची गाडी आणि २५ हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याशिवाय करक आणि हंगू येथूनही जादा रुग्णवाहिका आणि बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. डेरा इस्माईल खान जिल्ह्याचे आपत्कालीन अधिकारी मोहम्मद आरिफ खान यांच्या सूचनेनुसार आणखी चार रुग्णवाहिका आणि बचाव कर्मचारी पाठवण्यात आलेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केल्याचं बचाव पथकाने स्पष्ट केलंय.

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी भारतावर आरोप

या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. खैबर पख्तूनख्वाचे गव्हर्नर फैसल करीम कुंडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या घटनेचा अहवाल मागवलाय. मात्र, गव्हर्नर साहेबांनी आपल्या निवेदनात या घटनेला 'फितना अल-हिंदुस्तान खारीजी' असं नाव देत, हा भारताचा पाठिंबा असलेल्या दहशतवाद्यांचा कट असल्याचा आरोप केलाय. अर्थात, या आरोपांना कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी भारतावर हे बिनबुडाचे आरोप केलेत. याआधी गेल्या आठवड्यातच कोहाट पोलीस लाईन्सजवळील एका मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात २३ जण मारले गेले होते. यात १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा स्फोट घडवून आणल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस कंपाऊंडमध्ये घुसून हल्ला केला होता. अफगाणिस्तानस्थित हाफिज गुल बहादूरच्या नेतृत्वाखालील इत्तेहादुल मुजाहिदीन पाकिस्तान (IMP) या संघटनेने त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Fariba Hashimi: सायकल चालवली म्हणून लोकांनी दगडं मारली, आज तालिबानला भिडून ती बनली इंटरनॅशनल चॅम्पियन!
Sydney Cost Of Living: सिडनीमध्ये राहण्याचा खर्च किती? भारतीय तरुणाने सांगितला महिन्याचा २.६ लाखांचा हिशोब