
Operation Hawkeye : सीरियातील इस्लामिक स्टेटच्या विरोधात अमेरिकेने पुन्हा एकदा मोठी सैन्य कारवाई केली आहे. पल्मायरा परिसरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेच्या सैन्यातील तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळेच पेंटागन यांनी या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला. यामुळेच अमेरिकेकडून ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक राबवण्यात आले आहे. या ऑपरेशनचे उद्देश ISIS चे नेटवर्क पूर्णपणे संपवण्याचा आहे.
पेंटागन प्रमुख पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर माहिती देत म्हटले की, 13 डिसेंबरला सीरियामधील अमेरिकेच्या सैन्याच्या ठिकाणी हल्ला झाला. यामध्ये दोन अमेरिकन नागरिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर तीन सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. याच हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अमेरिका आपल्या नागरिक आणि सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही. जगात कुठेही अमेरिकन नागरिकांना निशाणा केल्यास त्याचा मागोवा घेत त्याला संपवले जाईल.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, या ऑपरेशनअंतर्गत मध्य सीरियामधील ISIS संबंधित जवळजवळ 70 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दहशतवाद्यांना लपण्यासाठी ठिकाण, हत्याराचे भांडार केंद्र आणि ट्रेनिंग बेसचा समावेश आहे. पेंटागनने संकेत दिले आहेत की, स्थितीनुसार येणाऱ्या दिवसात आणखी कारवाई केली जाऊ शकते.
या ऑपरेशनमध्ये अमेरिका आणि मित्रपक्ष देशांनी आपल्या सैन्याच्या ताकदीचे प्रदर्शन केले. हल्ल्यासाठी एफ 15 ईगर फायटर जेट, ए 10 थंडरबोल्ट अटॅक एअरक्राफ्ट, AH-64 अपाचे हेलिकॉप्टर आणि HIMARS रॉकेट सिस्टिमचा वापर करण्यात आला. याशिवाय जॉर्डनच्या एफ-16 लढाऊ विमानांचा देखील समावेश होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सैन्य कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, या हल्ल्याच्या माध्यमातून ISIS च्या मजबूत ठिकाणांना निशाण्यावर घेतले जात आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जी कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकेवर हल्ला करेल किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करेल त्यांना आधीपेक्षा अधिक भयानक स्वरुपात उत्तर दिले जाईल.
सीरियाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांच्या प्रति डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन दर्शवले आहे. याशिवाय या दोघांच्या नात्याला एक वेगळेच वळण लागले आहे. अलीकडेच अल-शारा यांनी वॉशिंग्टनचा दौरा केला होता. ही पहलीच वेळ होती जेव्हा सीरियामधील एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाइट हाउसचा दौरा केला होता.