Viral Video: हा भारत नाही, नेपाळ आहे! रस्त्यावर थुंकणाऱ्या भारतीयांना नेपाळी तरुणाने शिकवला धडा

Published : Apr 08, 2026, 05:51 PM IST
Viral Video from Nepal

सार

Viral Video from Nepal: नेपाळमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. यात एक स्थानिक नेपाळी तरुण, रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या दोन भारतीय व्यक्तींना थांबवून त्यांच्याकडूनच ती जागा साफ करून घेताना दिसतोय.

नेपाळ: नेपाळमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. या व्हिडिओमध्ये, रस्त्यावर गुटखा थुंकल्याबद्दल एक स्थानिक नेपाळी तरुण दोन भारतीय व्यक्तींना जाब विचारताना दिसतोय. इतकंच नाही, तर तो त्यांच्याकडून ती जागा स्वच्छ करायलाही लावतो. तो नेपाळी तरुण ठामपणे म्हणतो, "ये इंडिया नहीं हैं भाई, नेपाल हैं, गंदा मत करो, पानी डालो उधर” (हा भारत नाही, भाऊ, हे नेपाळ आहे. इथे घाण करू नका. तिथे पाणी टाकून साफ करा.)

हा प्रकार घडत असताना, थुंकणाऱ्यांपैकी एक जण 'सॉरी' म्हणतो, तर दुसरा त्या डागावर पाणी ओतताना दिसतो.

त्यावर तो नेपाळी तरुण पुढे म्हणतो, “इंडिया से इतने बडे देश से आते हो, इधर आके गंदा करते हो, सॉरी बोलने से पहले सोचना चाहिए.” (भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशातून येता आणि इथे येऊन घाण करता, सॉरी म्हणण्याआधी विचार करायला हवा होता.)

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युझर्सनी सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याविरोधात आवाज उचलणाऱ्या त्या नेपाळी तरुणाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी गुटखा खाण्याच्या सवयीवर आणि नागरिकांच्या शिस्तीवर बोट ठेवलं आहे.

अनेक सोशल मीडिया युझर्सनी तंबाखू आणि गुटखा उत्पादनांवर कडक नियम आणि बंदी घालण्याची मागणी केली आहे.

एका युझरने लिहिलं, "जर सरकारने पान, तंबाखू, गुटखा आणि दारूवर बंदी घातली, तर भारतातील नागरिकांच्या वागणुकीत ९५% सुधारणा दिसेल."

दुसऱ्या युझरने कमेंट केली, “अशा उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या कंपन्या आणि चित्रपटांवर 'स्वच्छ भारत सेस' लावावा.”

तिसऱ्या युझरने प्रश्न विचारला, “प्रश्न हा आहे की का नाही? सरकार यावर पूर्णपणे बंदी का घालू शकत नाही?”

 

 

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Meta Muse Spark AI: गणितातली ती ६ रहस्यं मेटाच्या AI ने खरंच सोडवली का?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'