Minority Safety : पाकिस्तानात हिंदू तरुणाला गोळ्या झाडून जीवे मारले, तीव्र पडसाद

Published : Jan 10, 2026, 05:44 PM IST
Minority Safety

सार

Minority Safety : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कैलाश कोल्ही नावाच्या एका हिंदू तरुण शेतकऱ्याला जमीनदाराने गोळ्या झाडून जीवे मारल्याची घटना घडली आहे. याच्या निषेधार्थ अल्पसंख्याक आणि मानवाधिकार संघटनांनी मुख्य रस्ते अडवून आरोपीच्या अटकेची मागणी केली.

(Minority Safety) इस्लामाबाद : आपल्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंचा प्रश्न कायम धगधगता राहिला आहे. बांगलादेशात 2024मध्ये विद्यार्थ्यांच्या तीव्र हिंंसक आंदोलनानंतर सत्तांतर झाले. मात्र, या आंदोलनादरम्यान आणि नंतरही सुरू असलेल्या हिंसाचारात अल्पसंख्य हिंदूंनाच लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्येही अल्पसंख्य हिंदू सुरक्षित नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. आता अशीच एक घटना घडल्याने हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू तरुण शेतकऱ्याला जमीनदाराने जीवे मारल्यानंतर तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. अल्पसंख्याक आणि मानवाधिकार संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे. कैलाश कोल्ही असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सरफराज निसानी असे आरोपी जमीनदाराचे नाव आहे. आरोपीने हिंदू शेतकरी कैलाश कोल्हीच्या छातीत गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ही घटना 4 जानेवारी रोजी झाली. कैलाश कोल्हीला का मारण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोल्हीच्या मृत्यूनंतर, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यांनी मुख्य रस्ते अडवले आणि आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. प्रशासन उच्चभ्रू लोकांना पाठीशी घालत असून अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हिंदू अल्पसंख्याक संघटना आणि मानवाधिकार गटांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आरोपींना तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर जीवे मारण्याचा तसेच दहशतवादाचे गुन्हे दाखल करावेत आणि पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

पाकिस्तान दरावर इत्तेहाद या अल्पसंख्याक हक्क संघटनेचे अध्यक्ष शिव काछी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral video: ट्रेनवरील बिबट्याचा हल्ला ते पुन्हा नोटबंदी; बातम्यांची सत्यता काय?
डोनाल्ड ट्रम्पसारखी हुबेहूब नक्कल करणारा चायनीज कलाकार रायन चेन सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)