ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेटाकडून १ कोटी रुपयांची देणगी

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खाजगी भेट दिल्यानंतर दोन आठवड्यांनी ही देणगी दिली आहे.

मेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील मेटा कंपनीने जवळपास एक कोटी रुपये देणगी दिली आहे. ट्रम्प यांच्याशी जवळीक साधण्याचा झुकरबर्ग यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. झुकरबर्ग यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी ट्रम्प यांनी एकदा दिली होती. २०२१ च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर झुकरबर्ग यांनी ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले होते. त्यामुळे ट्रम्प आणि झुकरबर्ग यांच्यातील संबंध बिघडले होते. दोन वर्षांनंतर २०२३ मध्ये ही बंदी उठवण्यात आली.

निवडणुकीपूर्वी मार्क झुकरबर्ग यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला नव्हता. मात्र, ट्रम्प यांच्यावर झालेल्या टीकेला ट्रम्प यांनी दिलेल्या प्रत्युत्तराची त्यांनी प्रशंसा केली होती. मेटाच्या या कृतीतून झुकरबर्ग यांच्या ट्रम्प यांच्याबद्दलच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दिसून येत असल्याचे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाल्यानंतर झुकरबर्ग यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना अभिनंदनाचा संदेशही पाठवला होता. बुधवारी, फ्लोरिडातील मार-ए-लागो इस्टेटमध्ये मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्रीच्या जेवणात सहभाग घेतला. भेटीदरम्यान ट्रम्प आणि त्यांच्या टीमसोबत झुकरबर्ग यांनी बैठक घेतल्याचे मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले. बैठकीतील चर्चेचे तपशील मात्र जाहीर करण्यात आलेले नाहीत.

झुकरबर्ग ट्रम्प यांच्या येणाऱ्या सरकारवर अधिक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे, आणि कदाचित त्यांना तंत्रज्ञानविषयक धोरण तयार करण्यात योगदान देण्याची संधी मिळू शकते, असे सीएनएनने वृत्त दिले आहे. रिपब्लिकन पक्ष व्हाईट हाऊस आणि काँग्रेसचे नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत असताना, टेक कंपन्यांचे सीईओ आपली भूमिका बदलत आहेत. ट्रम्प यांच्यावर टीका करणारे Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांनीही अलीकडेच ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.

Share this article