Biggest Airport: हे जगातले सर्वात मोठे विमानतळ आहे. याचा आकार एका देशापेक्षाही मोठा आहे. सर्वात मोठे विमानतळ म्हणून याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा मिळवला आहे. हे विमानतळ कोणते आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून नोंद झालेल्या किंग फहद इंटरनॅशनल एअरपोर्टचे क्षेत्रफळ ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. सौदी अरेबियातील दम्माम शहरात उभारण्यात आलेले हे विशाल विमानतळ सुमारे 776 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. हे क्षेत्रफळ शेजारील बहरीन देश आणि सिंगापूरपेक्षाही खूप मोठे आहे. एका स्वतंत्र देशाच्या भूभागापेक्षा जास्त क्षेत्रफळावर विमानतळ पसरलेले असल्यामुळे या विमानतळाला इतके महत्त्व आले आहे.
23
विमानतळ मोठे आहे पण...
या विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ इतके प्रचंड असले तरी, विमान वाहतूक आणि प्रवासी सेवांसाठी सध्या केवळ 37 ते 43 चौरस किलोमीटरचा भागच वापरला जातो. उरलेला विस्तीर्ण वाळवंटी प्रदेश भविष्यातील गरजा आणि सुरक्षेच्या दृष्टीने राखीव ठेवला आहे. इथे बांधलेले सहा मजली मुख्य टर्मिनल आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे. हजारो लोकांना नमाज पठण करता यावे यासाठी टर्मिनलच्या वरच्या भागात एक मोठी मशीदसुद्धा उभारण्यात आली आहे.
33
सौदी राजघराण्यासाठी विशेष
सौदी राजघराण्यातील सदस्य आणि परदेशी मान्यवरांच्या येण्याजाण्यासाठी इथे एक विशेष रॉयल टर्मिनल उभारण्यात आले आहे. सर्वात मोठी विमानेसुद्धा सुरक्षितपणे उतरवता यावीत यासाठी प्रत्येकी चार किलोमीटर लांबीच्या दोन धावपट्ट्या आणि अत्याधुनिक तांत्रिक सुविधा इथे उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या गर्दीच्या बाबतीत जगातील इतर गजबजलेल्या विमानतळांच्या तुलनेत इथे गर्दी कमी असली तरी, जमिनीच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत एका देशालाही लाजवेल असा आकार असल्याने हे विमानतळ जगाला आश्चर्यचकित करत आहे.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.