ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांची पत्नी केट मिडलटनला mRNA Covid लसीकरणामुळे कॅन्सर ? काय आहे नेमकं कारण जाणून घ्या...

इंग्लंड राजघराणाच्या केट मिडलटन यांच्यावर सध्या किमो थेरपी सुरु आहे. तसेच कोव्हीड लसीकरणामुळे कॅन्सर झाल्याचे देखील सांगण्यात येत होते मात्र त्या संपूर्ण अफवा खोट्या असल्याची पुष्टी त्यांनी केली आहे.

केट मिडलटन, प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी शुक्रवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, त्यांना कॅन्सरचे निदान झाले असून सध्या त्यांच्यावर किमो थेरपी पद्धतीने उपचार आहेत.मी माझे संपूर्ण कुटुंब भक्कमपणे याच्याशी लढत असून लवकरच यासगळ्यातुन आम्ही बाहेर पडू असा . तसेच कोव्हीड लसीकरणामुळे त्यांना कॅन्सरचे निदान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

केट यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं की त्यांना कर्करोग झाला आहे. मात्र, कोणता कर्करोग आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. “काही चाचण्या झाल्या. त्यानंतर मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. माझ्यासाठी आणि विल्यमसाठी ही धक्कादायक बातमी होती. आता मी ठीक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केमोथेरपी घेत आहे,” असं त्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या.

अनेकांच्या अंदाजानुसार वेल्सची राजकुमारी, केट मिडलटन यांना कॉव्हिडच्या लसीमुळे कर्करोग झाला असावा. राणी आणि राजा चार्ल्स यांनाही लस देण्यात आली होती. त्यामुळे हेच मुख्य कारण असू शकते दोघांनाही कॅन्सर होण्याचे. परंतु राजकुमारी केटने हे संपूर्ण दवे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यात माझ्यावर एक शास्त्रकिर्या करण्यात आली. त्यावेळी कॅन्सर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र काही काळानंतर टेस्ट केल्यावर कॅन्सरचे निदान झाल्याचे त्यांनी सांगितले.

COVID-19 लसींमुळे कॅन्सर होतो का?

तज्ञांनी अशा अहवालांवर स्पष्टीकरण दिले आहे, ज्यात कोविड-19 लसींमुळे कॅन्सर होतो किंवा कॅन्सर संबंधातील कोणतेही पुरावे अजून सापडलेले नाही त्यामुळे कोव्हीड लॅसिकरंकेल्याने कॅन्सर होतो हे म्हणणे चुकीचे आहे.

 

Share this article