'तुम्ही कुठेही असा, शोधून मारू'; इराणच्या धमकीने खळबळ,नेतान्याहूंचा मुलगाही गायब

Published : Mar 15, 2026, 01:15 PM IST
Iran Threatens to Hunt Down and Kill Netanyahu Amid Disappearance Rumors

सार

Iran Threatens to Hunt Down and Kill Netanyahu Amid Disappearance Rumors: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना शोधून ठार मारण्याची धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दिलीये. नेतान्याहू आणि त्यांचा मुलगा सार्वजनिक ठिकाणी दिसत नसल्याच्या सोशल मीडियावरील चर्चांदरम्यान ही धमकी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना शोधून ठार मारण्याची धमकी दिली आहे. "लहान मुलांना मारणारा गुन्हेगार जिवंत असेल, तर आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला संपवू," असं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने एका निवेदनात म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून नेतान्याहू सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्याने या धमकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.

रिपोर्टनुसार, इस्रायलने १२ मार्च रोजी नेतान्याहूंचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पण हा व्हिडिओ AI ने बनवला असून त्यांच्या एका हाताला सहा बोटं दिसत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. अर्थात, इस्रायलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

याच व्हिडिओमध्ये नेतान्याहूंनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खमेनी यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावाही केला जातोय. दुसरीकडे, समीक्षक कॅंडेस ओवेन्स यांनीही "नेतान्याहू कुठे आहेत?" असा प्रश्न विचारला आहे. मात्र, नेतान्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या त्यांच्या कार्यालयाने फेटाळून लावल्या आहेत. नेतान्याहूंची प्रकृती ठीक असल्याचं कार्यालयाने स्पष्ट केलंय. काही युझर्सच्या मते, त्यांचा मुलगा येर नेतान्याहू (Yair Netanyahu) सुद्धा सोशल मीडियावरून गायब झाला आहे. 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर येर खूप सक्रिय असून त्याचे जवळपास २,८४,००० फॉलोअर्स आहेत. पण त्याने ९ मार्चपासून कोणतीही पोस्ट केलेली नाही.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

SpaceX Starlink: स्टारलिंकच्या एन्ट्रीमुळे टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले, बर्नस्टीनने घटवले टार्गेट
Yellow Diamond: अमेरिकेतील पार्कमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करताना सापडला ६.०३ कॅरेटचा दुर्मिळ हिरा