Hormuz Strait : इराणची भारताला मोठी सवलत, 5 मित्र देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली!

Published : Mar 27, 2026, 09:17 AM IST
Iran Opens Strait of Hormuz for India

सार

Iran Opens Strait of Hormuz for India : इराणने भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह ५ मित्र देशांच्या व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ही घोषणा केली आहे.

Iran Opens Strait of Hormuz for India : इराणने भारत, रशिया, पाकिस्तान आणि चीनसह ५ मित्र देशांच्या व्यापारी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) वाहतुकीसाठी खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्वतः ही अधिकृत घोषणा केली आहे.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे आणि गॅसचे दर प्रचंड वाढले होते. ही सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली न केल्यास इराणवरील हल्ले आणखी तीव्र केले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर, अराघची यांनी इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'आम्ही भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांना मित्र मानतो. त्यामुळे त्यांच्या व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी आम्ही दिली आहे.'

शत्रूंसाठी मार्ग बंदच:

'पण, इराणच्या शत्रूंसाठी ही सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही युद्धात आहोत आणि हा संपूर्ण परिसर युद्धक्षेत्र आहे. त्यामुळे आमच्या शत्रूंना आणि त्यांच्या मित्र देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण बाकीच्यांसाठी हा मार्ग खुला आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इराण भारतावर इतका मेहेरबान का?

  • इराण आधीच महागाईच्या संकटात सापडला होता, आता तिथली परिस्थिती आणखी बिघडली आहे.
  • तांदूळ, भाज्यांसारख्या अनेक भारतीय वस्तूंवर इराण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
  • तांदळासह तब्बल १.०९ लाख कोटी रुपयांचा माल अजूनही भारतातच अडकून पडला आहे.
  • जर भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नसती, तर या वस्तूंची निर्यात झाली नसती.
  • याशिवाय, भारतासोबत इराणचे पूर्वीपासूनच खूप चांगले संबंध आहेत.
  • पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे इराणच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत.

होर्मुझ बंद करणारा लष्करी कमांडर इस्रायली हल्ल्यात ठार

जेरुसलेम: होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी हे अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत.

देशात ६० दिवसांचं तेल, ३० दिवसांचा गॅस साठा: केंद्र सरकार

नवी दिल्ली: सध्या देशात दोन महिन्यांची गरज भागेल इतकं कच्चं तेल आणि ३० दिवस पुरेल इतका गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असं केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट केलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!