अधिकाऱ्यांच्या मते, विमानात एकूण 11 जण होते, ज्यात 8 क्रू सदस्य आणि 3 प्रवासी होते. हे तिन्ही प्रवासी सागरी व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे अधिकारी होते. दक्षिण सुलावेसीचे लष्करी कमांडर मेजर जनरल बांगुन नवोको यांनी सांगितले की, हवाई दलाचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि बचाव पथके तैनात केली आहेत. मात्र, मारोस आणि पांगकेप जिल्ह्यांचा दुर्गम भाग बचाव कार्यात अडथळा ठरत आहे.