New York Mayor : न्यूयॉर्कच्या मेयरपदी मुस्लिम नेत्याच्या निवडीची शक्यता, भारताशी आहे खास कनेक्शन

Published : Jun 27, 2025, 06:04 PM ISTUpdated : Jun 27, 2025, 06:06 PM IST
New York Mayor : न्यूयॉर्कच्या मेयरपदी मुस्लिम नेत्याच्या निवडीची शक्यता, भारताशी आहे खास कनेक्शन

सार

जोहरन ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराची डेमोक्रॅटिक मेयर प्राथमिक निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. तर या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन नेत्यांनी भारतीय वंशाच्या मुस्लिम नेत्यावर इस्लामोफोबिक टिपणी केल्या आहेत. 

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहराच्या डेमोक्रॅटिक मेयर प्राथमिक निवडणुकीत ३३ वर्षीय भारतीय वंशाचे मुस्लिम नेते जोहरन ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मेयर म्हणून खरोखरी निवड झाली तर ते न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन आणि मुस्लिम मेयर बनतील. त्यांच्या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षात उत्साह निर्माण झाला आहे, तर ट्रम्प समर्थक रिपब्लिकन नेते आणि सोशल मीडिया नेटिझन्समध्ये खळबळ माजली आहे.

ट्रम्प आणि रिपब्लिकन नेत्यांचा तीव्र हल्ला

जोहरन ममदानी यांच्याविरुद्ध इस्लामोफोबिक हल्ले सुरू झाले आहेत. अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा डिजिटल स्वरूपात बुर्खा घातलेला फोटो शेअर केला. बुर्खा घातलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो डॉन कीथ नावाच्या ट्रम्प समर्थकाने 'अभिनंदन न्यूयॉर्क' या कॅप्शनसह शेअर केला. नॅन्सी मेस यांनी ममदानी यांचा कुर्ता-पायजामा घातलेला फोटो शेअर करून लिहिले की, ९/११ नंतर आम्ही म्हटले होते 'नेवर फॉरगेट'. असं वाटतंय की आपण खरंच विसरलो आहोत.

 

 

 

 

 

 

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, हे अखेर झाले, डेमोक्रॅट्सनी सीमा ओलांडली. जोहरन ममदानी, १००% कम्युनिस्ट वेडा, डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणूक जिंकला आहे. आता मेयर होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही पूर्वीही कट्टरपंथी डाव्यांना पाहिले आहे, पण हे खूप जास्त झाले आहे.

सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टिपणी

एका नेटिझनसे लिहिले, की NYC २००१: आम्ही कधीही विसरणार नाही! NYC २०२५: मुस्लिम जिहादी निवडला! NYC २०४०: शरिया कायदा माना किंवा निघून जा! NYC २०६०: इस्लाम स्वीकारा किंवा मरा!

तर दुसऱ्या नेटिझनने म्हटले, की न्यूयॉर्कची मूर्खता स्वतःच्या नाशासाठी मतदान करत आहे. जर हा जिहादी खरोखरच मेयर झाला तर या शहरावर प्रलय येईल.

ममदानी यांचे प्रत्युत्तर

जोहरन ममदानी यांनी डेमोक्रॅटिक वादविवादात ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, मी डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात वाईट स्वप्न आहे. एक प्रगतीशील, मुस्लिम स्थलांतरित जो आपल्या विश्वासांसाठी लढतोय.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे मुस्लिम कनेक्शन

रंजक गोष्ट म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूळ रचना फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्ट बार्थोल्डी यांनी इजिप्तच्या पारंपारिक नकाबपोश महिलेच्या रेखाटनावरून घेतली होती. सुरुवातीला त्यांनी इजिप्त सरकारला एक अरब महिला म्हणून 'प्रगतीचा दिवा' धारण केलेल्या पुतळ्याचा प्रस्ताव दिला होता. पण इजिप्तने तो नाकारला. त्यानंतर बार्थोल्डी यांनी त्या डिझाइनवर पुन्हा काम करून क्लासिकल रोमन देवी म्हणून घडवले. अमेरिकेला भेट दिले, जे आज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून ओळखले जाते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर