पाकिस्तानी मैत्रिणीच्या लग्नाला भारतीय मैत्रिणीने ऑनलाइन हजेरी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमुळे त्यांना प्रत्यक्षात लग्नाला उपस्थित राहता आले नाही.
मनुष्यांमध्ये फूट पाडण्यात धर्म आणि देशांच्या सीमांचा मोठा वाटा असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बंधन असतात. अशाच एका परिस्थितीतून जाणाऱ्या एका भावनिक व्हिडिओने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. पाकिस्तानी मैत्रिणीच्या लग्नाला ऑनलाइन अॅपद्वारे पाहणाऱ्या भारतीय मैत्रिणींचा हा व्हिडिओ होता. या भावनिक क्षणी सोबत राहता न आल्याबद्दल खूप दुःख झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
देशांच्या नियमांमुळे जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला फेसटाइमद्वारे पाहण्यास भाग पाडले गेले, असे म्हणत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. 'खूप जवळ, पण खूप दूर' असे व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'बजरंगी भाईजान, मला पाकिस्तानात घेऊन जाऊ शकता का? माझे हृदय माझ्या शरीराबाहेर असताना माझी बहीण पत्नी बनताना पाहते तेव्हा "आतापर्यंत इतके जवळ" कधीच वाटले नव्हते, सीमेच्या पलीकडे तिला कधीही वाईट नजरेचा सामना करावा लागू नये, माझ्या मन्नू आणि जिजूंना नेहमीच प्रेम आणि समृद्धी लाभो', असे कॅप्शन देऊन डान्सर आणि कोरिओग्राफर अनामिका आहुजा हिने शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत चार लाख ऐंशी हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओमध्ये, वर येताना मैत्रिणी टाळ्या वाजवतात आणि आनंदाने रडत चेहरा पुसताना दिसत आहेत. व्हिडिओखाली अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्या आहेत. आम्हाला जमले नाही ते तुमच्या पिढीला जमावे, असे एका प्रेक्षकाने लिहिले. भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्याचे कारण मला आवडत नाही, असे दुसऱ्या एका प्रेक्षकाने लिहिले. भारत आणि पाकिस्तान एक झाले तर चीनला मागे टाकून ते पुढील महासत्ता बनतील, असे आणखी एकाने भावनिकपणे लिहिले.