India China Direct Flights : गलवान संघर्षानंतर गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. या निर्णयामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
गलवान संघर्षानंतर, भारत आणि चीनने ५ वर्षांनी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. इंडिगो एअरलाइन २६ ऑक्टोबरपासून चीनसाठी आपली सेवा सुरू करणार आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ लावल्याने दोन्ही देश जवळ येत असल्याचे दिसून येत आहे.
24
भारत - चीन संबंध
भारत-चीन संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, दोन्ही देशांनी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली. डोकलाम संकटानंतर थांबलेली ही सेवा कोविडमुळे लांबली होती.
34
इंडिगोची विमानसेवा
इंडिगोने कोलकाता ते ग्वांगझू (Guangzhou) थेट विमानसेवा २६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर दिल्ली-ग्वांगझू सेवाही सुरू होईल. यासाठी एअरबस ए३२०निओ विमानांचा वापर होईल.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या दिल्ली भेटीनंतर थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा झाली. गेल्या वर्षभराच्या चर्चेनंतर हा निर्णय झाला असून, यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.