New technology : कामचा ताण कमी करण्याऐवजी लागला जीवाला घोर! AI ची दुसरी बाजू...

Published : Feb 12, 2026, 09:51 PM IST

New technology : AI अर्थात आर्टिफिशअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वेळ वाचवण्याऐवजी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवत आहे, असं एका नवीन अभ्यासात समोर आलं आहे. जाणून घ्या यासंदर्भातील धक्कादायक सत्य!

PREV
14
AI

जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आलं, तेव्हा ते ऑफिसची कामं सोपी करेल आणि वेळ वाचवेल असं वाटलं होतं. पण अमेरिकेतील ताज्या सर्वेक्षणातून याच्या अगदी उलट निष्कर्ष समोर आले आहेत.

24
अभ्यासातून समोर आलेले सत्य

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, एका अमेरिकन टेक कंपनीतील कर्मचारी AI वापरू लागल्यापासून त्यांच्या कामाचा भार वाढला आहे. उरलेल्या वेळेत त्यांच्यावर अधिक काम करण्यासाठी दबाव टाकला जातो.

34
वाढलेला कामाचा ताण

AI मुळे कर्मचारी त्यांच्या क्षेत्राबाहेरील कामंही करू लागले आहेत. उदा. डिझायनर्स कोडिंग करत आहेत. यामुळे सुरुवातीला आवड वाटत असली तरी, नंतर कामाचा बोजा आणि मानसिक ताण वाढतो.

44
पुसट होणाऱ्या सीमा

AI टूल्समुळे काम आणि वैयक्तिक आयुष्यातील सीमा पुसट होत आहे. यामुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळत नाही. 

कंपन्यांची जबाबदारी : कंपन्यांनी हे ओळखून कामाच्या वेळेची मर्यादा ठरवावी.

Read more Photos on

Recommended Stories