Health Tips: लैंगिकदृष्ट्या समाधानातील असणाऱ्या टॉप 10 देशांची यादी जाहीर झाली आहे. या सर्वेक्षणात काही आश्चर्यकारक तथ्ये समोर आली आहेत. लैंगिक समाधान, रोमँटिक आयुष्याच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात
लग्न आणि वैवाहिक जीवन प्रत्येक देशाच्या प्रगतीत योगदान देते. अलीकडच्या काळात लग्न आणि घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. दरम्यान, अनेक संस्थांनी लग्न, जीवन, प्रेम, लैंगिकता यासह अनेक विषयांवर अभ्यास करून अहवाल दिले आहेत. आता लैंगिक समाधानी देशांची यादी जाहीर झाली आहे.
25
रोमँटिक आयुष्यात भारताचा कितवा क्रमांक?
हे आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. रोमँटिक आयुष्य आणि लैंगिक समाधानी देशांमध्ये भारताला पहिले स्थान मिळाले आहे. या अभ्यासानुसार, भारतातील सर्वाधिक जोडपी लैंगिकदृष्ट्या समाधानी आहेत. भारतातील 88 टक्के लोकांनी लैंगिक समाधान असल्याचे म्हटले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
35
नात्यांना महत्त्व
भारतात नात्यांना खूप महत्त्व दिले जाते. तसेच प्रत्येक नात्याला पवित्र मानले जाते. त्यामुळे भारतातील जोडप्यांमध्ये लैंगिक समाधान जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा अहवाल कोणत्या आधारावर तयार करण्यात आला आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी याच कारणामुळे भारत यामध्ये नंबर 1 आहे, असे म्हणत टोमणे मारले आहेत.
जगात सर्वात कमी घटस्फोटाचे प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील घटस्फोटाचे प्रमाण हजारामागे 0.01 आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण खूपच कमी आहे.