Good news: आता जीमेल आयडी देखील बदलता येणार, नेटिझन्ससाठी गुगलकडून आनंदाची बातमी

Published : Dec 27, 2025, 03:50 PM IST

Good news : गुगल आता एक नवीन अपडेट आणत आहे. यामुळे युजर्सना नवीन अकाऊंट न बनवता आपला जीमेल युझरनेम बदलता येणार आहे. या बदलामुळे तुमच्या गुगल ड्राइव्ह, फोटोज यांसारख्या सेवांमधील डेटावर कोणताही परिणाम होणार नाही.

PREV
14
जीमेल युझरनेममध्ये बदल

अनेक वर्षांपासून जीमेल (Gmail) युजर्सना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. गुगल सध्या जीमेल युझरनेम बदलण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर विकसित करत आहे. यामुळे, नवीन गुगल अकाऊंट न बनवता, त्याच अकाऊंटवर नवीन जीमेल ॲड्रेस निवडता येईल. विशेषतः, लहानपणी तयार केलेला मेल आयडी आता बदलू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे.

24
गुगल जीमेल अपडेट

हे नवीन अपडेट फक्त @gmail.com ने शेवट होणाऱ्या मेल ॲड्रेससाठी लागू होईल. एकाच गुगल अकाऊंटमध्ये, जुना जीमेल आयडी बदलून नवीन जीमेल युझरनेम निवडता येईल. या बदलामुळे Google Drive, Photos, YouTube, Play Store यांसारख्या सेवांमधील डेटा, खरेदी केलेली सबस्क्रिप्शन्स किंवा अकाऊंट हिस्ट्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. जुना मेल आयडी रिकव्हरी मेल म्हणून सेव्ह केला जाईल, त्यामुळे सुरक्षेची चिंता राहणार नाही.

34
कधी मिळणार सुविधा?

ही सुविधा सर्वांना एकाच वेळी मिळणार नाही. गुगल टप्प्याटप्प्याने हे फीचर आणत आहे. युजर्स गुगल अकाऊंच सेटिंग्जमध्ये 'Personal info' → 'Email' या विभागात जाऊन हे ऑप्शन उपलब्ध आहे की नाही, हे तपासू शकतात. एकदा बदल केल्यानंतर, जुन्या आणि नवीन दोन्ही जीमेल आयडीवर येणारे मेल एकाच इनबॉक्समध्ये मिळतील. तसेच, लॉग इन करताना दोन्ही मेल ॲड्रेस वापरता येतील.

44
गुगल अकाउंट अपडेट

मात्र, यावर काही निर्बंधही आहेत. एकदा जीमेल युझरनेम बदलल्यानंतर, पुढील बदलासाठी 12 महिने थांबावे लागेल. या काळात, जुन्या आयडीवर परत जाण्याची सोय असेल. तसेच, तो जुना जीमेल आयडी वापरून नवीन गुगल अकाऊंट तयार करता येणार नाही. एका गुगल अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त तीन वेळाच युझरनेम बदलता येईल. यामुळे, एकाच अकाऊंटवर कालांतराने चार जीमेल ॲड्रेस वापरण्याची संधी मिळेल.

Read more Photos on

Recommended Stories