Hormuz Strait: एकही जहाज रोखलं तर होर्मुझची सामुद्रधुनीच ताब्यात घेऊ: ट्रम्प

Published : Mar 10, 2026, 01:25 PM IST
Donald Trump Warns Iran of Seizing Hormuz Strait Over Shipping Threats

सार

Donald Trump Warns Iran of Seizing Hormuz Strait Over Shipping Threats: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, तर थेट ती सामुद्रधुनीच ताब्यात घेऊ, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.

वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल व्यापारात इराणने कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकन सैन्य थेट होर्मुझ सामुद्रधुनीचा भागच ताब्यात घेईल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून अयातुल्ला मोजतबा खमेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला. सध्या तेलाचे दर २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.

जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के पुरवठा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. पण इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून या मार्गावरील जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. इराणने केलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांमध्ये मालवाहू जहाजांचं मोठं नुकसान झालं आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (International Maritime Organization) माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत जहाजांवरील ७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या ही सामुद्रधुनी खुली असून जहाजांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. यापुढे कोणतीही आगळीक केल्यास इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, अशी धमकीही त्यांनी दिली. पण, या सामुद्रधुनीतून एकही जहाज जाऊ देणार नाही, यावर इराण अजूनही ठाम आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Iran War : इराणमध्ये अंतर्गत कलह? एका गुप्त पत्राने खळबळ, अमेरिका-इस्रायलच्या दबावाखाली रणनीती बदलणार?
इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानमध्ये दाखल, शांततेसाठी होणार महत्त्वाची चर्चा