26/11 चा आरोपी तहव्वूर राणाच्या भारत प्रत्यार्पणाला मंजूरी, ट्रम्प यांची घोषणा

Published : Feb 14, 2025, 09:03 AM ISTUpdated : Feb 14, 2025, 09:04 AM IST
Tahawwur Rana

सार

गेल्याच महिन्यात अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी मंजूरी दिली होती. या खटल्यातील तहव्वूर राणाच्या शिक्षेविरुद्धची त्याची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

Tahawwur Rana is going back to India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 26/11 मधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terror Attack) दोषी तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजूरी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, तहव्वूर राणाला न्यायासाठी सामोरे जावे लागेल. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजूरी दिली होती. याशिवाय कोर्टाने त्याच्या शिक्षेविरुद्धची त्याची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

मूळ पाकिस्तानातील कॅनडियन व्यावसायिक तहव्वूर राणावर भारतात वर्ष 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्रमुख भूमिका निभावल्याचा आरोप लावण्यात आला होता. यामध्ये तहव्वूर राणा दोषीही आढळला आहे.

भारताने अमेरिकेतील एजेंसीसोबत माहिती शेअर केली होती, जी कनिष्ठ न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात ठेवण्यात आली होती. भारताच्या या पुराव्यांना कोर्टाने स्विकारले होते. भारताने दिलेल्या कागदपत्रांमध्ये 26/11 हल्ल्यातील तहव्वूरच्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला होता. भारताकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जात होती. कारण मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील फरार आरोपी होता.

कोण आहे तहव्वूर राणा?

मुंबई पोलिसांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासंबंधित आपल्या चार्जशीटमध्ये तहव्वूर राणाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्याच्यावर पाकिस्तानातील गुप्त एजेंसी इंटर सर्विसेज इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा एक सक्रिय सदस्याच्या रुपात काम करण्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये राणावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, त्याने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमॅन हेडलीची मदत केली होती. मुंबईत कुठे-कुठे हल्ले करायचे, त्या जागांची रेखी तहव्वूर राणाने केली होती. यानंतर एक प्लॅन तयार करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना दिला होता.

आणखी वाचा : 

Tulsi Gabbard: अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक

मोदींची फ्रान्स भेट: AI, अणुऊर्जा, स्टार्टअप्सवरील करार

PREV

Recommended Stories

Brown University Shooting : अमेरिकेमध्ये परीक्षेत झालेल्या गोळीबारात 2 ठार, 8 गंभीर जखमी, कोणी आणि कसा केला हल्ला?
भारतावरील ट्रम्प यांचे 50% शुल्क रद्द होणार? 3 खासदारांचा धक्कादायक प्रस्ताव