Maradona Ball : मॅराडोनाच्या 'हँड ऑफ गॉड' गोलचा तो बॉल, तब्बल ३२ कोटींना विकला गेला!

Published : Aug 25, 2026, 03:21 PM IST
Maradona Ball : मॅराडोनाच्या 'हँड ऑफ गॉड' गोलचा तो बॉल, तब्बल ३२ कोटींना विकला गेला!

सार

फुटबॉलचा देव मानल्या जाणाऱ्या दिएगो मॅराडोनाच्या वादग्रस्त 'हँड ऑफ गॉड' गोलसाठी वापरलेला फुटबॉल तब्बल ३२ कोटी रुपयांना लिलावात विकला गेला आहे.

मुंबई : फुटबॉलचा देव, अर्जेंटिनाचा दिएगो मॅराडोना... त्याच्या गाजलेल्या आणि वादग्रस्त 'हँड ऑफ गॉड' गोलसाठी वापरलेला फुटबॉल तब्बल ३.३५ मिलियन अमेरिकन डॉलर्सना (म्हणजे जवळपास ३२ कोटी रुपये) विकला गेला आहे. पण हा बॉल कोणी विकत घेतला, हे मात्र सुरक्षेच्या कारणास्तव लिलाव करणाऱ्या कंपनीने गुलदस्त्यात ठेवलं आहे.

अमेरिकेच्या डॅलस शहरातील 'हेरिटेज' या लिलाव कंपनीने हा लिलाव आयोजित केला होता. त्यांना खरंतर या बॉलला कमीत कमी १० मिलियन डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा होती. पण अपेक्षेपेक्षा निम्मी किंमतही न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

१९८६ च्या वर्ल्ड कपमध्ये काय घडलं होतं?

१९८६ च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये मॅराडोनाने आपल्या डाव्या हाताने बॉलला गोलपोस्टमध्ये ढकललं होतं. पण ट्युनिशियाचे रेफ्री अली बिन नासेर यांच्या हे लक्षात आलं नाही आणि त्यांनी तो गोल देऊन टाकला. या वादग्रस्त गोलनंतर फक्त ४ मिनिटांनी मॅराडोनाने इंग्लंडच्या ६ खेळाडूंना चकवत, ७० मीटर धावत एक जबरदस्त गोल केला. हा गोल 'शतकातील सर्वोत्तम गोल' म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिनाने ही मॅच २-१ ने जिंकली आणि पुढे जाऊन वर्ल्ड कपही जिंकला.

या क्वार्टर फायनल मॅचनंतर हा फुटबॉल तब्बल ३६ वर्षं रेफ्री नासेर यांच्याकडेच होता. २०२२ मध्ये त्यांनी तो २.३७ मिलियन अमेरिकन डॉलर्सना विकला होता.

मॅराडोनाची जर्सी विकली गेली होती ९.३ मिलियन डॉलर्सना!

मॅराडोनाने 'हँड ऑफ गॉड' गोल केलेल्या मॅचमध्ये घातलेली जर्सी २०२२ मध्ये तब्बल ९.३ मिलियन डॉलर्सना (त्यावेळच्या डॉलरच्या दरानुसार सुमारे ७३ कोटी रुपये) विकली गेली होती.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय