Colombia Earthquake : कोलंबियामध्ये भूकंपाचे धक्के, ७.४ तीव्रतेने शहरात हादरे; अनेक इमारतींचं नुकसान

Published : Aug 10, 2026, 09:14 PM IST
Colombia Earthquake

सार

Earthquake In Colombia : कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. भूकंपाच्या हादऱ्यांनी अनेक इमारतींचं नुकसान झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

कोलंबिया : दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत. ७.४ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळते आहे. 'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'ने (USGS) या भूकंपाबाबत माहिती दिली आहे. हा भूकंप कोलंबियाच्या चोको विभागातील 'सॅन होजे डेल पाल्मार'पासून पूर्वेकडे जवळपास ५ किलोमीटर अंतरावर झाला. भूकंपाचं केंद्र कोलंबियाची राजधानी बोगोटापासून जवळपास ४०० किलोमीटर दूर होतं. जमिनीखाली १०७ किलोमीटर खोलीवर त्याची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनी इमारतींचं नुकसान

सोमवारी आलेल्या या भूकंपाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर लोकांनी आपापल्या घरांमधून, इमारतींमधून बाहेर धाव घेतली. हा भूकंप इतका जोरदार होता, की याचे हादरे केवळ कोलंबिया आणि कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटा इथेच जाणवले नाहीत, तर शेजारील देश व्हेनेझुएला, इक्वेडोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपानंतर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती

चोकोच्या गव्हर्नर नुबिया कॅरोलिना कोर्डोबा-कुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर काही लोक जखमी झाले आहेत आणि अनेक इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसंच नारिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यांचं त्यांनी सांगितलं.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष दिलं जात आहे. तसंच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय